Ashadhi wari : मोठी बातमी, आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सर्व वाहनांना आजपासून टोल माफ ; शिंदे सरकारचा निर्णय
पुणे (प्रतिनिधी): आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याचा जीआर काढण्यात आला आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना सरकारकडून टोल माफी दिली जाणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत असणार आहे. आजपासून म्हणजेच तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत वारकऱ्यांसाठी टोल माफी केली जाणार आहे. राज्य सरकारने यासंबधीचा जीआर काढला आहे. अक्षय महाराज भोसले यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिले आहेत. त्यासंबधीचा जीआर देखील काढण्यात आला आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)