गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: आमदार कल्याणशेट्टी यांचे जनता दरबार ठरत आहे सर्वसामान्यसाठी “संकट मोचक”

HTML img Tag Simply Easy Learning    

कुरनूर (प्रतिनिधी):अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी दर सोमवारी जनता दरबार भरतात त्या जनता दरबारच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे सर्व सर्वसामान्य नागरिकांतून समाधान होत असल्याचे बोलले जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

शाळकरी कॉलेजचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील अडचणी, ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक युवती त्यांना थेट आमदारांपर्यंत जनता दरम्यानच्या माध्यमातून जाता येते त्यामुळे त्यांच्या व्यथा थेट आमदारांसमोर मांडण्याची संधी नागरिकांना मिळते. यातून त्यांचे त्वरित प्रश्न मार्गी लागतात त्यामुळे हे जनता दरबार अक्कलकोट करांसाठी संकटाचे निवारण ठरत आहे. तालुक्याचे नेतृत्व असल्यामुळे फारसा वेळ त्यांना मिळत नाही आणि अशातच भाजपचा जिल्हाध्यक्षाची त्यांच्यावर जबाबदारी पडली आहे त्यामुळे प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. जनता दरबार च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतात.या जनता दरबाराला दर सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि याला उत्तम प्रतिसाद नागरिकांचा आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात आपले व्यथा घेऊन उपस्थित राहतात.तहसील कार्यालय, नगर परिषद, पोलीस स्टेशन,ग्रामपंचायत, दवाखाना,गावातील समस्या अशा अनेक अडचणी घेऊन सर्वसामान्य नागरिक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पर्यंत पोहोचतो. लोकसभेसाठी जनतेने आम्हाला विधानसभेमध्ये पाठवले आहे त्यामुळे त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि सर्वसामान्य नागरीकांचे काम करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असे जनता दरबार बद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी सांगतात.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button