
वागदरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

वागदरी — लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.यावेळी वाचनालयातील जेष्ठ वाचक कोटप्पा कोटे,श्रीकांत सोनकवडे ,गुरु खराडे, विजय कलशैटी, सरदार हंचाटे, जावळकोटी , निलगार , सुधिर सोनकवडे व कर्मचारी सुरेश छुरे, ग्रंथपाल सोनकवडे
उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधीर सोनकवडे त्यांनी म्हणाले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिक्षण विषयक तळमळ, द्रस्टेपणा, समाज सुधारणा, आरक्षण विषयक समानतेचे धोरण, कलात्मक दृष्टी तसेच शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.असे विविध पैलू रयतेच्या राजाचे वेगळेपण आपल्या विचारातून व्यक्त केले.
