गावगाथा

ना.स.प. पुणे शहर शाखेचा वधूवर सुची प्रकाशन सोहळा संपन्न

आजवर नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेतर्फे

 

ना.स.प. पुणे शहर शाखेचा वधूवर सुची प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे:- आजवर नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेतर्फे करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती ऐकीव आणि प्रसिध्दि माध्यमातूनच मिळत होती. आज मात्र मला आमंत्रित करून

नामा म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी ||

हे ज्ञानेश्वरी वरील नामदेव महाराजांच्या भाष्यानुसार आज पुणे शहर शाखेचे कार्यक्रम मी स्वतः अनुभवत आहे असे गौरव उद्गागार प्रख्यात विधीतज्ञ अॅड. गणेशजी यवतकर यांनी काढले

ना.स.प. पुणे शहर शाखा आयोजित राज्यस्तरीय शिंपी समाजातील वधूवर मेळाव्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या वधूवर सुचीचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. ६ जुलै रोजी मलाबार ज्वेलर्स, लक्ष्मी रोड येथे अध्यक्ष श्री. संदिप लचके यांचे पुढाकाराने संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नामदेव समाजोन्नती परिषदेचे नवनिर्वाचित विभागिय अध्यक्ष श्री. रणजित माळवदे यांनी भूषविले. यावेळी प्रमूख पाहूण्यांमध्ये सर्वश्री नामदेव समाजोन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, स्वागताध्यक्ष एकनाथ सदावर्ते साहेब, निमंत्रक दिलीप वायचळ साहेब, सुभाष पांढरकामे, मा. नगरसेवक विनोद वस्ते, मलाबार गोल्डचे महाराष्ट्र विभाग प्रमुख अन्वर सर तर व्यस्थापक सौ. दिक्षा देसाई, अॅड. गणेशजी यवतकर, तुळशीबाग मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पंडीत यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

ना.स.प. पुणे शहर शाखा नेहमीच उत्तम व अनुकरणीय असे कार्यक्रमाचे आयोजन करीत असते याबद्दल मा. नगरसेवक विनोद वस्ते यांनी पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके व संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके यांनी वधूवर मेळाव्यास सहकार्य करणारे देणगीदार, जाहीरात दार, हीतचिंतक समाज बंधू भगिनीचे आभार व्यक्त करून संपूर्ण कार्यकारिणीच्या सहकार्यानेच कार्यक्रम यशस्वी होत असतात यांचे संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकारिणीला जाते असे आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुची निर्मितीसाठी भरीव योगदान दिले बद्दल सौ. विजया कालेकर व मनिषा धोंगडे यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी ना.स.प चे विश्वस्त मा. वसंतराव खुर्द, कार्यालयीन सचिव दिंगबर क्षीरसागर, ना.स.प. पिंपरी चिंचवड शहर शाखेचे उपाध्यक्ष मा. कैलास नेवासकर व सचिव सौ. रेखा गाडेकर, रमेश मेहेर, संजय वैद्य, मा. मनोज मांढरे, अॅड ज्ञानेश्वर पाटसकर, दिपक नेवासकर, डाॅ. लक्ष्मण कालेकर, अॅड. अरविंद निरगुडे, अशोक नेवासकर, अॅड. प्रकाश शिंदेकर, प्रशांत झनकर, राजकिशोर सुपेकर, पुरूषोत्तम खर्डे, प्रशांत बोबटे, जीवन हेद्रे, संजय मुळे, शिरीष मोहीते यांचे सह नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी, पुणे शहरातील बहुसंख्य ज्ञातीसंस्थाचे अध्यक्ष, समाज बंधूभगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या पहाडी आवाजात कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन प्रशांत सातपुते यांनी करून कार्यक्रमाची उंची वाढवली.

तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ना.स.प. पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे, कार्याध्यक्ष प्रदिप खोले, उपाध्यक्ष कुंदन गोरटे, सोमनाथ मेटे, अक्षय मांढरे, खजिनदार शिवाजी माळवदकर, सहसचिव स्वप्निल खुर्द, राहुल सुपेकर, प्रशांत भोंडवे, अरूण काळे, मिलिंद पाडळकर, नितीन लचके, चिन्मय निमकर, अक्षय पांढरकामे, वसंत हांगेकर, मदन लंगडे, खांबेकर यांच्यासह पुणे शहर शाखेच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. अशी माहिती पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button