गावगाथाठळक बातम्या

Indian Railway : आषाढी वारीसाठी पुण्याहून १२ ‘आषाढी स्पेशल डेमू’ गाड्या सुटणार ; पाहा वेळापत्रक

पुणे (प्रतिनिधी): आषाढी एकादशी साठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे विभागाने पुणे मिरज पुणे दरम्यान 12 अतिरिक्त अनारक्षित डेमू आषाढी स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या 15 ते 20 जुलै या दरम्यान धावणार आहेत.

01209 अनारक्षित डेमू आषाढी स्पेशल दिनांक 15 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 (6 ट्रिप) या कालावधीत पुण्याहून सकाळी 8.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4.15 वाजता मिरजला पोहोचेल.

01210 अनारक्षित डेमू आषाढी स्पेशल दिनांक 15 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 (6 ट्रिप) या कालावधीत मिरज येथून सायंकाळी 4.45 वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी हडपसर, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सालग्रे आणि आरग येथे थांबेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button