गावगाथा

गळोरगीत रक्तदानाने मोहरम साजरा शिबिरात २७ जणांनी केले रक्तदान .,

रक्तदान शिबीर आयोजन २०२४

गळोरगीत रक्तदानाने मोहरम साजरा शिबिरात २७ जणांनी केले रक्तदान .,

ता. अक्कलकोट मौजे गळोरगी येथे सामाजिक बांधिलकी जपत हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला मोहरम सण रक्तदानाचा अभिनव उपक्रम राबवत उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच, मोहरम पंच कमिटी व गळोरगी ग्रामस्थ आणि श्री महात्मा बसवेश्वर रक्त पेढी सोलापुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात २७ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन प्रगतील शेतकरी श्री लक्ष्मण आजुरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी श्री खाजाभाई नदाफ हे होते.मकर संक्रांत , गुढी पाडवा व मोहरम निमित्त प्रत्येक वर्षी श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच व गळोरगी ग्रामस्थांमार्फत सलग मागील वीस वर्षापासुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. आता पर्यंत एकुण ३०-३५ वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करत संपुर्ण सोलापुर जिल्हयात व अक्कलकोट तालुक्यात गळोरगी हे छोटेसे गाव पर्थम क्रमांकाचे एक आदर्श गाव ठरले आहे

.प्रत्येक रक्तदात्याला २० लिटर्स क्षमतेचे पाण्याचे जार युवा मंच मार्फत देण्यात आले व अल्पोपहाराची सोय करण्यात आली.शिबिरासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री मल्लप्पा झग्गे, श्री पंडीत प्रचंडे, श्री सिद्रामप्पा बिराजदार, श्री नागप्पा बिराजदार, श्री बाबुराव व्हनकोळ, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रा चंद्रकांत पाटील,LIC MDRT मेंबर श्री शिवानंद बिराजदार,श्री चंद्रशेखर जमादार, श्री सिध्दाराम जकापुरे, श्री सिध्दप्पा झग्गे,श्री संतोष बणजगोळ, श्री बसवराज संजवाड व गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक सुत्रसंचालन दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री वहिदपाशा शेख तर आभार गळोरगी कॅांग्रेस आय अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांनी मानले.रक्तदान जनजागृती मार्गदर्शन माहीती माजी सैनिक श्री बसवराज पाटील यांनी दिली.शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री चंद्रकांत निरोणे,श्री रामेश्वर बिराजदार,श्री शरण बिराजदार, श्री प्रकाश मैंदर्गी, वे ईरय्या स्वामी,श्री सातलिंग आजुरे, श्री चन्नप्पा निरोणे,श्री संतोष अंदोडगी,मा तंटामुक्त अध्यक्ष श्री सिध्दाराम बिराजदार,श्री शिवराज बिराजदार ,श्री दमनु जमादार, श्री भिमाशंकर पुजारी,श्री चंद्रकांत माशाळे,श्री लक्ष्मण बाके,श्री संजय निंबाळे, श्री शिवराज भासगी,श्री मनोज जामनीकर , श्री सिकंदर शेख व गळोरगी ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button