गावगाथा

समाज सेवा भूषण पुरस्कार गोविंद खरटमल आणि सूर्यकांत इंगळे यांना प्रदान

सन्मान पुरस्कार

समाज सेवा भूषण पुरस्कार गोविंद खरटमल आणि सूर्यकांत इंगळे यांना प्रदान

पंढरपूर प्रतिनिधी: अमोल धडके

संत कक्कय्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी महामंडळामध्ये लागेल त्या वेळेस अडीअडचणीच्या वेळेस धावपळ,सतत धडपड करणारे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे सहसचिव सूर्यकांत इंगळे व सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे सदस्य गोविंद खरटमल यांना समाज सेवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१७ जुलै २०२४ रोजी समस्त ढोर कक्कय्या समाज मठ पंढरपूर यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी च्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत इंगळे व गोविंद खरटमल यांना समाज सेवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांना सन्मान पत्र,सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.असे म्हणतात की मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात.याचाच आदर्श समोर ठेवून समाज सेवकांचा सत्कार पंढरपुरात आयोजित करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ कोकणे, सचिव सोमनाथ गजाकस, खजिनदार कृष्णा कटके, उपसचिव शिलाताई शिंदे, मा सचिव सुखदेव शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव घोडके, जनरल मॅनेजर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, व सर्व समाज बांधव उपस्थित होते.हा पुरस्कार मिळाल्याने या दोन्ही समाज सेवकांचे सर्व स्तरातून कौतुकाचा,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button