ठळक बातम्या
Mumbai : सेंट टेरेसा बॉईज वांद्रे शाळेचा दहावीचा 100 टक्के निकाल

मुंबई (प्रतिनिधी- गणेश हिरवे) : वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल या शाळेचा सन 2023-24 इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल लागला असून सर्वच्या सर्व 160 मुल पास झाल्याने शाळेचे प्रिन्सिपॉल फदर निकी, मॅनेजर फादर हेन्री सीईओ फादर शिनोय, उपमुख्यद्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज आणि शाळेतील शिक्षक पालकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

ही शाळा जरी कॅथलिक असली तरी येथे शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो..खेळातही शाळेतील मुल खूप हुशार आहेत.100 टक्के निकाल लागल्याने सर्वच खुश आहेत.पवार प्रियांशू, सार्थक कुबल आणि खान अफान यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.यापूर्वीही अनेकवेळा या शाळेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे.
