गावगाथा

शिंपी समाजातील २५ गरीब होतकरू मुलांचे पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व बालन ग्रुप स्विकारेल:- मा. पुनीतदादा बालन..

सामाजिक बांधिलकी

शिंपी समाजातील २५ गरीब होतकरू मुलांचे पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व बालन ग्रुप स्विकारेल:- मा. पुनीतदादा बालन…

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे…मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे:- सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गुरूपौर्णिमा निमित्ताने नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे वतीने लक्ष्मी रोड वरील मलाबार गोल्ड शोरूमच्या हाॅलमध्ये मा. पुनीतदादा बालन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. स.प पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदिप लचके यांनी पुणे शहर शाखेच्या कार्याचा उल्लेख करून मा. पुनीतदादा बालन याचे सामाजिक कार्याचा योगदानाबद्दल उपस्थितांना माहीती दिली. यावेळी मलाबारचे गोल्डच्या व्यवस्थापिका सौ. दिक्षा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी म्हणून शिंपी समाजातील २५ गरीब होतकरू मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व बालन ग्रुप स्विकारेल असे पुनीतदादा बालन यांनी सत्काराला उत्तर देताना जाहीर केले.
यावेळी ना.स.प.पुणे विभागीय उपाध्यक्षपद रणजित माळवदे, पुणे जिल्हाध्यक्ष विजय कालेकर, पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष सुभाष पांढरकामे, कुंदन गोरटे, सोमनाथ मेटे, राहुल सुपेकर, स्वप्निल खुर्द, शिवाजी माळवदकर, प्रशांत भोंडवे, अरूण काळे, मदन लंगडे, नितीन लचके, शंकर खांबेकर, अक्षय लचके, सौ. शोभा मुळे, सौ. ललिता पांढरकामे, सौ. सुजाता माळवदे, सौ.स्मिता भोडवे, सौ. रूपा माळवदकर, सौ. निता खांबेकर उपस्थित होते अशी माहिती पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button