गावगाथा

आसताने सय्यद दातापीर शहा कादरी रह. दर्गाहचा ७९ वा ऊर्स २८ जुलै ते ३० जुलै पर्यंत ऊर्स होणार संपन्न.

उरूस

आसताने सय्यद दातापीर शहा कादरी रह. दर्गाहचा ७९ वा ऊर्स २८ जुलै ते ३० जुलै पर्यंत ऊर्स होणार संपन्न.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – अक्कलकोट सोलापूर रोड येथील आसताने सय्यद दातापीर शहा कादरी रह. दर्गाहचा ७९ वा ऊर्स २८ जुलै रविवार पासून प्रारंभ होत असुन तीन दिवस चालणाऱ्या या ऊर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दर्गाचे सज्जादा नशीन हजरत सय्यद शहा दाता पीर गुलाम आलमनवाज शहा कादरी किबला व हजरत सय्यद शहा मस्तुर गुलाम अलमनवाज शहा कादरी किबला व इरफान दावण्णा यांनी दिली.दर्शनासाठी व प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दर्गा प्रमुख हजरत सय्यद शहा दाता पीर गुलाम आलमनवाज शहा कादरी किबला यांनी केले.
अक्कलकोट शहर व तालुक्याचे सर्वधर्मस्वभावाचे व जातीय सलोख्याचे मोठे प्रतीक असलेले दातापीर दर्गाच्या उर्स निमित्त २८ जुलै रविवार रोजी गंध (संदल), २९ जुलै सोमवार रोजी चिराग (दीपस्त व ऊर्स) व ३० जुलै मंगळवार रोजी ज्यारत(प्रसाद)असे धार्मिक कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले आहे.
ऊर्सच्या तिन्ही दिवशी महाप्रसादाचा (लंगर) आयोजन दर्ग्याच्या वतीने करण्यात येणार आहे.
२८,२९,३० ह्या तीन दिवस चालणाऱ्या ऊर्स व भजन,कवाली,नात,धार्मिक कार्यक्रमांमध्ये आणि तिन्ही दिवस चालणाऱ्या प्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान दर्गा चे प्रमुखहजरत दाता पीर शाह कादरी साहेब यांनी केले आहे.
या वेळी हजरत दाता पीर बाबाच्यां ऊर्समध्ये हिंदु मुस्लिम धर्मियांसह सर्वच धर्मीय बांधव मोठया संख्येने सहभागी होतात.
यावेळी हजरत दाता पीर शाह कादरी, हजरत मस्तूर शाह कादरी,हुसेन बळोरगी,इरफान दावन्ना,फारूक बबर्ची,मूर्तूज बाजे,रशीद खिस्तके,सोहैल फरास(सामजिक कार्यकर्ते),रजाक सय्यद,मुबारक कोरबु,वाहिद मुल्ला जाकीर दरेखा, मुर्तूज बाजे,सलीम गंवडी ,दाता बळोरगी, व पत्रकार बंधू आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button