*नागणसूर मराठी शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा एक मॉडेल, सुंदर शाळा :सौ शांभवीताई सचिनदादा कल्याणशेट्टी*
नागणसूर : नागणसूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आज महिला मेळावा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. नागणसूर तुप्पीन मठाचे मठाधिपती डॉक्टर श्री. अभिनव बसवलींग महास्वामीजी यांच्या दिव्यसानिध्यात व सौ शांभवी सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्ष तें खाली मोठया उत्साहात पार पडला.व्यासपीठवार नागणसूरचे सरपंच सुनीताताई महादेव चव्हाण मा.जि.प सदस्य सौ शिलवंती भासगी ग्रा.सदस्य सौ मल्लमा मणुरे, सौ तेजश्री मंटगी बचत गटाचे प्रमुख सौ संगीता देवरमनी अंगणवाडी सेवेका सौ कल्याण, सौ .श्रीदेवी विभुते मुख्याध्यापिका सौ निर्मला मलगणकर मॅडम उपस्थित होते.
प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व श्री. बसवलिंगेश्वर महास्वामीजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता 1 ली 2 री 6 वी विद्यार्थिनींनी गीतातून पाहुण्यांचे स्वागत केले.. विद्यार्थिनींनी प्रसिद्ध महिला व्यक्तिरेखा सकारून पाहुण्याचे लक्ष वेधून घेतले. यानंतर चि आदित्य लक्ष्मण प्रचंडे या विद्यार्थ्याचा वाढदिवस मोठया थाटात साजरा करण्यात आला.त्यांच्या कढून सर्व उपस्थिती महिला व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
इयत्ता पाहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांना पुष्प करून स्वागत करण्यात आले.आलेल्या महिलांचे गुलाब पुष्प भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर महिला भगिनींसाठी मनोरंजनात्मक टिकली लावणे संगीतखुर्ची,लिंबूचमचा, उखाणे स्पर्धा, पाककला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी उत्साहाने सर्व खेळात सहभाग घेतला. त्यातील विजेत्याना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा परीक्षा व खेळ सांस्कृतीक स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.250च्या वर महिला उपस्थित होत्या .त्यांना व विद्यार्थ्यांना आशिर्वचन करताना मराठी शाळेने महिली भगिनींसाठी सुंदर कार्यक्रम पाहून. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा भगिनींना जणू काही माहेरीच आल्यांचा समाधान नागणसूर मराठी शाळेना दिला तसेच शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो.असे गौरवोद्गार डॉ अभिनव बसवलिंग महास्वामीजी आशीर्वचन केले.
शेवटी उपस्थित महिलामधून लकी ड्रॉ काढण्यात आले.विजेत्या भगिनीला भेट वस्तू देण्यात आली. स्पर्धा परीक्षा ट्रॉफी साठी श्री.बसवराज मंटगी तर महिला मेळाव्यास अध्यक्ष विश्वानाथ प्रचंडे उपाध्यक्ष बसवराज मोरे तर प्रमाणपत्र धनराज धनशेट्टी व हणमंत मणुरे यांचे सौजन्य लाभले. भव्य दिव्य कार्यक्रमास नागणसूर महसूल गावातील मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बसवराज खिलारी यांनी तर आभार सौ.सुरेखा हसरमनी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका निर्मला मलगणकर मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा हसरमनी ,लक्ष्मी कोटे राजकुमार गोब्बूर ,सिद्धाराम तळवार, विश्वनाथ देवरमनी, राजश्री कल्याण ,बसवराज खिलारी, मंजुनाथ मणुरे सुरेश येलगुंडे ,परशुराम चव्हाण आदिनी परिश्रम घेतले.

चौकोन
जिल्हा परिषद प्राथ मराठी शाळा नागणसूर ही खरंच एक मॉडेल शाळा आहे. सुंदर शालेय परिसर क्रियाशील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा शिक्षण या तिन्ही विभागात यश मिळवले आहे. याचं श्रेय शाळेतील अध्यापन करणाऱ्या शिक्षकाना जाते.
सौ शांभवीताई कल्याणशेट्टी
Back to top button
×
No WhatsApp Number Found!