गावगाथा

“जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

कार्यक्रमात गावातील काँग्रेस प्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती जाणवली.

 

HTML img Tag Simply Easy Learning    

“जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहीन” – मल्लिकार्जुन पाटील यांची वागदरीत ग्वाही

वागदरी (ता. अक्कलकोट):
काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज असलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यातील योगदानापासून आजपर्यंत काँग्रेसने लोकशाही मूल्यांची जपणूक केली आहे. आज मला जे जबाबदारीचे स्थान मिळाले आहे, ते मी जनतेच्या कल्याणासाठी वापरतोच राहीन. माझ्या वडिलांचा – माजी आमदार कै. महादेव पाटील यांचा वारसा पुढे नेत, मी प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहीन,” असे प्रतिपादन अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन महादेव पाटील यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

ते वागदरी येथील परमेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. त्यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल वागदरी ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन मजबूत करण्याचे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींवर लढा देण्याचे आश्वासन दिले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमाला जेष्ठ नेते मलप्पा मामा निरोळी, मलकप्पा पोमाजी, रवी वरनाळे, उमेश पोमाजी, शिवराज (मंत्री) पोमाजी, सिद्धा घोळसगाव, सिद्धू कोळी, श्रीकांत इंडे, लक्ष्मण सलगरे, श्रीशैल भरमदे, इस्राईल नदाफ, नागेश स्वामी, गुरुनाथ आळंद, शंकर घुगरे, दौलपा सुतार, राज यादव, दत्ता वरनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमात गावातील काँग्रेस प्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती जाणवली.


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button