श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे धार्मिकतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या उपक्रमांना महत्व देऊन देखील कार्यरत — आमदार धीरज विलासराव देशमुख
कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते व माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे धार्मिकतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या उपक्रमांना महत्व देऊन देखील कार्यरत — आमदार धीरज विलासराव देशमुख

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिकतेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या उपक्रमांना महत्व देऊन देखील कार्यरत असल्याचे मनोगत लातूर ग्रामीण चे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते व माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत विलास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. दिक्षिका धीरज देशमुख हे उपस्थित होते.

यावेळी आमदार धीरज देशमुख यांचे स्वीय सहायक सचिन मोरे, श्री क्षेत्र अक्कलकोटचे शिवराज स्वामी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, विश्वस्त संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, शहाजीबापू यादव, निखील पाटील, गोटू माने, पिट्टू साठे, बलभीम पवार, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराय होटकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
