गावगाथा

गुरुच्या आदराप्रित्यर्थ ८० वे रक्तदान पूर्ण केल्याबद्दल सुनील पुजारी यांचा भव्य सत्कार

रक्तदान

गुरुच्या आदराप्रित्यर्थ ८० वे रक्तदान पूर्ण केल्याबद्दल सुनील पुजारी यांचा भव्य सत्कार

नळदुर्ग ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालय अलियाबाद येथे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक 15ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय सणानिमित्त देशभक्तीची जाणीव ठेवून रक्तदान करणारे सुनील पुजारी यांनी आत्तापर्यंत ७९ वेळा रक्तदान केले होते. मुख्याध्यापक,साने गुरुजी कथा माला कार्यवाह, रामराज्य नगर चे सचिव पद अशा सर्व भूमिका सांभाळतानाही सामाजिक जबाबदारीची जाणीव यांनी सतत जोपासली आहे.अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना व ॲनिमिया आजारावर उपचार म्हणजे रक्त.माणूस स्वतः निर्माण करू न शकणाऱ्या गोष्टीचे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.त्यांचे ८० वे रक्तदान त्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत गुरुच्या आदराप्रित्यर्थची भावना व्यक्त करण्यासाठी परगावी असताना देखील पुणे येथे पूर्ण केले. याबद्दल ज्येष्ठ विचारवंत मा पन्नालाल भाऊ सुराणा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात सर्व मान्यवर,पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.त्यांच्या कार्याची महती लोकांना कळावी व लोकांनी या कार्याने प्रोत्साहित होऊन स्वतःही अशा प्रकारे आदर्शवत कार्य करावे यासाठी उदाहरणादाखल हा सत्कार करण्यात आला. ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे सर्व सदस्य व पालक यांनी देखील सुनील पुजारी यांचा अलौकिक कार्याबद्दल गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button