गावगाथा

राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे जिल्हा यांच्याकडून डॉ. मानसिंग साबळे यांचा सत्कार

उत्तम रुग्णसेवेबाबत केला सन्मान

राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे जिल्हा यांच्याकडून डॉ. मानसिंग साबळे यांचा सत्कार

– उत्तम रुग्णसेवेबाबत केला सन्मान

वालचंदनगर : उत्तम रुग्णसेवा केल्याबाबत पुण्यातील डॉ. मानसिंग साबळे या आरोग्यदूताचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संतोष पाटील, पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आला. नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंदिर या ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये हा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तहसीलदार श्री.रवींद्र सबनीस आएफओ चव्हाण साहेब, नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, मा.संतोष नाना खैरे, मा. राजू पायमोडे, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबूभाऊ पाटे आदि पाहुणे उपस्थित होते.

गेल्या ५ वर्षात कोविड काळापासून आजतागायत त्यांनी जुन्नर आंबेगाव तालुक्यातील असंख्य रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत केली आहे.
डॉ. साबळे स्वतः मदतीस आलेल्या प्रत्येक रुग्णाला तातडीने मदत करतात, तसेच अतिशय गरीब आणि गरजू रुग्णांना आवश्यक आर्थिक आणि वैदयकीय मदत मिळवून देतात. या सर्व कार्याशी ते एकनिष्ठ व प्रामाणिक आहेत. डॉ मानसिंग साबळे यांची हि जनसेवा व रुग्णसेवा नोंदणीय आहे. या सन्मानाबद्दल डॉ. साबळे यांनी आभार व्यक्त केले.
—-
फोटो ओळ- उत्तम रुग्णसेवा केल्याबाबत पुण्यातील डॉ. मानसिंग साबळे यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्य मा. आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button