*मंडळ अधिकारी मा. संजय सोनटक्के यांची महसूल खात्यातील 27 वर्षे सेवेतून निवृत्ती निमित्त RPI (आठवले) गटाच्या वतीने सत्कार*
सत्कार

*मंडळ अधिकारी मा. संजय सोनटक्के यांची महसूल खात्यातील 27 वर्षे सेवेतून निवृत्ती निमित्त RPI (आठवले) गटाच्या वतीने सत्कार*
अक्कलकोट
दिनांक 31/07/2024 येथील लोकाभिमुख महसूल विभागातील कर्मचारी तथा कष्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंडळ अधिकारी मा. संजय सोनटक्के हे आपल्या प्रदीर्घ 27 वर्षाच्या अखंड सेवेनंतर निवृत्त झाले एक लोकाभिमुख आणि निष्कलंक कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती त्यानी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तेथे पुरवठा विभागात सेवा केली तसेच सोलापूर अक्कलकोट तहसील कार्यालयात त्यांनी सेवा बजावली कनिष्ठ लिपक ते मंडळ अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांनी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या कष्ट्राईब संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील जवाबदारी सांभाळली आहे त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त अक्कलकोट तहसील कार्यालयात अनेक कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी आरपीआय (आठवले) गटाच्या वतीने तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवराज जमगे, गणेश कांदे,सनी सोनटक्के,गणेश सोनटक्के, स्वामीनाथबेंद्रे, आदी उपस्थित होते
सेवेचा शेवटचा दिवस म्हणून अक्कलकोटचे तहसिलदार मा. मगर साहेबांनी स्वतःच्या शासकीय गाडीने त्यांना घरी सोडून त्यांचा यातोचित्त सन्मान केला