Akkalkot : शिक्षक धानय्या कौटगीमठ ७७ वी परीक्षा उत्तीर्ण

अक्कलकोट : के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांनी आज केंद्रीय शिक्षक पात्रता सी टी ई टी जुलै २०२४ परीक्षा उत्तीर्ण झाले.

७ जुलै २०२४ रोजी सी टी ई टी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज ३१ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला .धानय्या यांनी परीक्षेत १५० पैकी ९९ गुण (६६% ) तसेच सामाजिक शास्त्र विषयात १५० पैकी ९१ गुण मिळवत (६० %) दोन्ही परीक्षेत बाजी मारली. आतापर्यंत सलग ७७ वी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पराक्रम धानय्या यांनी केले आहे.


देशातील विविध राज्यातील सेट ,नेट ,टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन ,स्वतः ला मिळालेल्या ज्ञानाचा ,अनुभवाचं।इतर विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने यु ट्यूब मार्फत धानय्य सरानी मोफत मार्गदर्शन करीत आहेत.आता पर्यंत ७०२ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
