गावगाथाठळक बातम्या

Bhimashankar: भिमाशंकर पर्यटनासाठी पुढील दोन महिन्यांसाठी राहणार बंद

पुणे (प्रतिनिधी): भीमाशंकर अभयारण्य परिसरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन व सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेले धबधबे, पाऊस, धुके यांचा वर्षा ऋतुमध्ये देवदर्शन व पर्यटन असा दोन्ही आनंद घेण्यासाठी भाविक, पर्यटक मोठ्या प्रमाणात भीमाशंकरला येत असतात.

मात्र यावर्षी वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य १ व वनपरिक्षेत्र अभयारण्य २ भीमाशंकर मधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून वनपरिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य १ व २ यांच्या वतीने या धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

भीमाशंकर वन्यजीव अभयाण्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेल्यामध्ये कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग, खोपीवली नियतक्षेत्र येथील चोंडीचा धबधबा, पदरवाडी जवळील न्हाणीचा धबधबा, नारीवली नियतक्षेत्रातील सुभेदार धबधबा, खांडस ते भीमाशंकर मार्ग येथील घोंगळ घाट नाला व शिडी घाट येथील पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांचे वतीने भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना वर्षाविहारात नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे व परवानगीशिवाय अवैध्यरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये असे अवाहन करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button