सलगर येथील ग्रामपंचायत सदस्यांची सामाजिक बांधिलकी मुलांच्या वाढदिवसा निमित्त वार्डात बोअरिंग मारून वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा
सामाजिक बांधिलकी

सलगर येथील ग्रामपंचायत सदस्यांची सामाजिक बांधिलकी मुलांच्या वाढदिवसा निमित्त वार्डात बोअरिंग मारून वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा


सलगर — येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे आपल्या मुलगा कु.स्वराज्य अमोल पुटगे याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त सलगर येथे बोअरिंग मारून देण्यात आले.सलगर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे पाण्याची खूप मोठी समस्या जाणवत आहे.तेव्हा मुलाच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च कमी करून स्वराज्य यांच्या आई स्वरा व वडील अमोल पुटगे (सदस्य, ग्रामपंचायत सलगर) सलगर गावातील जनतेचा पाण्याचा समस्या कमी व्हावी म्हणून बोअरिंग स्वखर्चाने मारून दिले.आता हे पाणी समस्थ गावकऱ्यांच्यासाठी उपलब्ध झाले आहे.
आमदार मा.श्री.सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांचा पाण्यासाठी केलेले अविरत कष्ट पाहून तिच प्रेरणा मनी घेवून आदर्श वाटचाल समाज व गावाप्रती करण्याचा प्रयत्न केलेला आहे.यावेळी मिलन (दादा) कल्याणशेट्टी..नन्नु कोरबु(भाजपा, जिल्हाध्यक्ष सेल),.चंद्रशेखर मडीखांबे (तालुका अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी),अमर(भाऊ)शिरसाठ(शहर अध्यक्ष,प्रहार),मल्लेशी शेळके(चेअरमन,शेळके प्रशाला,वागदरी),इरणणा धसाडे(संचालक, कृ. ऊ.बा.दुधनी),प्रवीण शटगार(युवा नेते),इक्बाल बिराजदार(उद्योगपती),अशोक पाटील (अध्यक्ष,तंटामुक्ती),श्रीशैल बिराजदार(पोलीस पाटील),संजय डोंगराजे(चेअरमन वि.का.सोसा)
मा.श्री.निजप्पा गायकवाड(तालुका अध्यक्ष,अनु.जाती सेल),धोंडुराज बनसोडे(सामाजिक कार्यकर्ते),अजय दुपारगुडे (सदस्य,ग्रा. प. निलेगाव),अशोक बिराजदार(युवा नेता),आकाश माने(सदस्य ग्रा. प. दर्शनाळ),निकिताताई धसाडे(सदस्या,ग्रा. प.सलगर),अजय मुकणार(शहर अध्यक्ष, रिपाई),.राजेश उर्फ गोटू शिंदे(RG ग्रुप),
सोनू पुटगे सह पंचकमिटी भीमनगर अक्कलकोट,
अमोल(भाऊ) पुटगे मित्र परिवार अक्कलकोट तालुका, सर्व सदस्य ग्रामपंचायत व समस्थ गावकरी मंडळ सलगर उपस्थित होते.परशुराम (दादा)भगळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
