गावगाथा
संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी किरण शिवाजीराव राठोड
निवड नियुक्ती

संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी किरण शिवाजीराव राठोड
अक्कलकोट दि. १३ (प्रदिनिधी)
संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्य पदी तालुक्यातुल डिग्गेवाडी तांड्यातील किरण शिवाजीराव राठोड व उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर येथील अशोक कनीराम चव्हाण यांची निवड शासनाचे उपसचिव पंडित जाधव यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकान्वे जाहीर करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये किरण राठोड व अशोक चव्हाण या शासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
सदर या योजनेअंतर्गत करावयाच्या कामांचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामांची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकरी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची समिती गठीत करण्यात आली असून, सदर समिती मध्ये बंजारा, लमाण समाजाचे दोन प्रतिनिधी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे. जिल्हा परिषदांमध्ये प्रशासन कार्यरत असल्याने, सदर अशासकीय सदस्यांची नेमणूक शासन स्तरावरून करणे आवश्यक असल्याचे दिसून आल्याने, सदर सदस्यांची तीन वर्षा करिता नियुक्ती करण्यात आलेली आहे.
किरण राठोड व अशोक चव्हाण यांच्या निवडीचे जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत असून तांडा समृद्धी योजनेतून सर्वांगीण विकासाची ग्वाही उभयत्यांनी दिली.