वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आयोजित समस्त ओबीसी संघटना प्रमुखांची बैठक संपन्न,,
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील ओबीसी समाज संघटनाच्या प्रमुखलोकांची बैठक समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर ..या ठिकाणी पार पडली,, यावेळी अनेक ओबीसी नेत्यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यात आले आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आवाहनानुसार 100 आमदार विधानसभेवर पाठवण्याचा निश्चय याठिकाणी करण्यात आला ,,ओबीसीचा मत ओबीसीलाच,,, ओबीसीचा मत एससी एसटी,,, एससी एसटी चा मत ओबीसीला,,, अशा प्रकारची घोषणा देऊन आगामी काळात होणाऱ्या विधानसभेला सर्व संघटना वंचित बरोबर युती करून निवडणुकीला सामोरे जाण्याची दृढनिश्चय या ठिकाणी करण्यात आला. गेल्या 40 वर्षापासून ओबीसी बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे करीत आहेत मंडल आयोग लागू करण्याचा महत्त्वाची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची होती अशा प्रकारचे मनोगत उपस्थित ओबीसी प्रमुखांच्या वतीने करण्यात आला,,, यावेळीधनगर समाज संघटनेचे उमेश काळे भीमाशंकर खांडेकर डीडी पांढरे ओबीसी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार ओबीसी समाज हक्क परिषदेचे अध्यक्ष माधुरी ताई पोतदार उद्धव सिंह कयवाले लोधी समाज संघटना सागर धनी वाले अजय काया वाले करण बोके वाले आकाश शाहीर जयसिंग कलावाले वडार समाज संघटनेचे विशाल पाथरूट भारती पाथरूट ओबीसी संघटनेचे महादेव माने प्रकाश कटारे चंद्रमुळी तमनुर सुरत धोत्रे तोपा चव्हाण प्रवीण शिंगाडे राजेश रंधिरे धर्मांना गावडे महासिंहप्पा बिराजदार बंजारा समाजाचे भोजराज पवार लेबर पार्टी ऑफ इंडियाचे बशीर अहमद शेख चंद्रशेखर बदलापुरे आकाश तीरेकर श्रीकांत घोडके डॉक्टर झाकीर शेख अमित राठोड नवनाथ साळवे. आदि उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विक्रांत गायकवाड विनोद इंगळे विजयानंद उघडे रवी पोटे साहिल कांबळे शिवाजी आप्पा बनसोडे शंकर शिंदे जालिंदर चंदनशिवे अमर डूरके विजय गायकवाड महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता ताई राजगुरू संगीता साबळे पुष्पाताई गायकवाड निशाताई बेले आदींनी परिश्रम घेतले..