Salgar : श्री बसवेश्वर विरक्त मठ कमिटीच्या वतीने गरीब कुटुंबातील जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न ; श्रावणमास प्रवचन कार्यक्रमातच ठरला मुहूर्त


अक्कलकोट (प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे श्रावणमासाच्या अनुषंगाने श्री शिवबसवेश्वर विरक्त मठात महिनाभर गुड्डापुर धानमा देवी यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुराण प्रवचन कार्यक्रम सुरू आहे. गदग चे श्री वेदमुर्ती शिवकुमार मागीमठ शास्त्रीजी यांच्या अमृतवाणीने हा महाप्रवचन चालु आहे.

या शुभ प्रसंगी आणखी एक शुभ सामाजिक कार्य घडला पाहिजे या उदात्त हेतुने एका गरिब जोडप्याचे संपुर्ण खर्चासहीत श्री बसवेश्वर विरक्त मठ कमिटीच्या वतीने विवाह सोहळा पार पडला. तर वऱ्हाडी मंडळी व ग्रामस्थांना दासोह भोजन माजी सैनिक जयशेखर पाटील यांच्याकडून देण्यात आले.

या आदर्शवत कार्यास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपस्थित राहून वधु-वरांना आशिर्वाद दिला. कौतुकास्पद सामाजिक कार्य असेच घडले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सलगर विरक्त मठाचे प,पु,श्री रेवणसिद्धेश्वर महास्वामीजीं यांचे दिव्य सान्निध्य लाभले तर माजी सरपंच सातलिंग गुडंरगी,तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक पाटील,संजयकुमार डोगंराजे,उपसरपंच काशिनाथ कुंभार,प्रविण शटगार,मल्लीनाथ भासगी, ग्रा,प,सदस्य रेवणसिद्ध म्हेत्रे,संदिप फुलारी,भिमण्णा जमादार,श्रीशैल चिकमळ,विजयकुमार फुलारी,दौलपा म्हेत्रे,आदिसह सलगरचे ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येत उपस्थित होते.
