श्री.वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी.स्वामी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रचला गर्दीचा नवा कीर्तीमान
अंदाजे ४ लाख भाविकांनी घेतला श्री स्वामी दर्शनाचा लाभ

श्री.वटवृक्ष मंदिरात श्रद्धेय भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी.स्वामी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रचला गर्दीचा नवा कीर्तीमान

अंदाजे ४ लाख भाविकांनी घेतला श्री स्वामी दर्शनाचा लाभ

मंदिर समिती, पोलीस प्रशासन, प्रशासकीय व्यवस्थापन सर्वांची झाली तारेवरची कसरत.


(श्रीशैल गवंडी, रविवार दिनांक २१/७/२०२४) – आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देतात. आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. पहाटे ५ वाजता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली. तदनंतर मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरेकेटींग करून करण्यात आली होती. प्रचंड गर्दीमुळे तासंतास दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी मुरलीधर मंदिर समोरील गेट पर्यंत पत्राशेड उभे करून भाविकांना पावसापासून संरक्षण देण्यात आले.
स्वामी भक्तांच्या प्रचंड गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांना रांगेतून व प्रसंगी टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. असंख्य स्वामी भक्तांनी आज स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ६ नंतर भाविकांची रांग वटवृक्ष मंदिरातून मुरलीधर मंदिर समोरून फत्तेसिंह चौक, भारत गल्ली, देशमुख गल्ली, डबरे गल्ली, आझाद गल्ली, मौलादी गल्ली, साउथ पोलीस स्टेशन समोरून सुभाष गल्लीच्या रिद्धीसिद्धी गणेश मंदिरापर्यंत जवळपास अडीच किलोमीटर भाविकांची रांग लांबली होती, ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली. सकाळी ११ वाजता महाराजांची नैवेद्य आरती संपन्न झाली. यानंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्या टफ्याने दर्शनास सोडण्यात आले. दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे भोजन महाप्रसाद देण्यात आले होते, हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आज दिवसभरात गुरूपौर्णिमेनिमीत्त आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब व कुटुंबीय सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, सोलापूरचे उद्योगपती गणेश कोळी व परिवार, सचिन पवार व परिवार तथा मित्रमंडळी, शिवराज म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव संजीव कुमार पाटील आदी मान्यवरांसह जवळपास ४ लाख स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.
सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे, पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली व तहसीलदार विनायक मगर, डीवायएसपी विलास यामावार व पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वामी भक्तांचे दर्शन कोणतेही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, मंगेश फुटाणे, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, महेश मस्कले, पवन पवार, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, संतोष पराणे, चंद्रकांत गवंडी व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी
तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, गोपनीय खात्याचे धनराज शिंदे, गजानन शिंदे व उपस्थित सर्व पोलीस प्रशासनाने
परिश्रम घेतले.

फोटो ओळ – गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सजविलेली मूर्ती व भाविकांची गर्दी दिसत आहे.