जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळा संपन्न.
वारी पालखी सोहळा

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळा संपन्न.

अक्कलकोट प्रतिनिधी: अमोल धडके

दिनांक १६ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वारकरी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची कु. प्राजक्ता झिंगाडे ही विद्यार्थिनी रुक्मिणी मातेच्या वेशभूषेत होती. सर्व प्रथम पालखीची पूजा करत मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांनी श्रीफळ वाढवून बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. विद्यार्थी आणि शिक्षक- शिक्षिका यांनी याप्रसंगी फुगडी खेळत सोहळ्याची शोभा वाढवली.जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेच्या आयोजित दिंडीमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ मृदुंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर येथे बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात पार पडला. तुळशी, पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममाण झालेले विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर यांच्यातर्फे आयोजित ग्रंथदिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार, इतर शिक्षकवृंद, हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे, हाजराबी बागवान, संध्या बशेट्टी, अनिता काटकर, दिनकर भारती आणि मराठी शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
