श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कार्य दखल घेण्याजोगे स्वामी दर्शनानंतर एस.बी.आय.चे महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह व अन्य मान्यवरांचा सन्मान करताना महेश इंगळे व अन्य मान्यवर दिसत आहेत.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान
समितीचे कार्य दखल घेण्याजोगे स्वामी दर्शनानंतर एस.बी.आय.चे महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह यांचे मनोगत
(अक्कलकोट, श्रीशैल गवंडी-२७/८/२०२४)
महाराष्ट्र राज्यातील तीर्थक्षेत्रांमध्ये येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य दखल घेण्याजोगे असल्याचे मनोगत
महाराष्ट्र मंडळ भारतीय स्टेट बँकचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह यांच्यासह मुख्य व्यवस्थापक दिनेश राव,
उप महाव्यवस्थापक कुमार परिमल प्रेम,
प्रशासकीय कार्यालय कोल्हापूरचे उप महाव्यवस्थापक पंकज कुमार बरनवाल, सोलापूरचे क्षेत्रीय व्यवस्थापक निशांत कुमार जयस्वाल, अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक
विकास खडतकर, उपव्यवस्थापक धनंजय सोन्याने यांचाही श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह बोलत होते. पुढे बोलताना सिंह यांनी राज्यातील अन्य देवस्थानच्या तुलनेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामींचे दर्शन विनामूल्य आहे हे सर्वसामान्य भाविकां करिता अत्यंत समाधानाची बाब आहे. या माध्यमातून भाविकांच्या भक्ती व श्रद्धेला बळ देण्याचे काम देवस्थानच्या माध्यमातून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे करीत आहेत ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे,
अक्कलकोटचे सनदी लेखापाल
ओंकार उटगे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महाव्यवस्थापक अरविंद कुमार सिंह व अन्य मान्यवरांचा सन्मान करताना महेश इंगळे व अन्य मान्यवर दिसत आहेत.
