श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भजन, पाळणा व आरतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा.
जन्माष्टमी दिनी रात्री ९ ते १२ भजन व रात्री १२ वाजता जन्मोत्सव, पाळणा, व आरती कार्यक्रम संपन्न.

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भजन, पाळणा व आरतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा.
जन्माष्टमी दिनी रात्री ९ ते १२ भजन व रात्री १२ वाजता जन्मोत्सव, पाळणा, व आरती कार्यक्रम संपन्न.
प्रथमेश इंगळे यांच्याहस्ते पाळण्याची आरती
(अक्कलकोट,दि.२७/८/२४) -श्रीशैल गवंडी सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे मुरलीधर मंदिर परिसराचे नवीन बांधकाम करण्यात येत असल्यामुळे यंदा जन्माष्टमीचे सर्व कार्यक्रम श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात घेण्यात आले. जन्माष्टमीदिनी रात्री ९ ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा संपन्न झाली. यानंतर गुलाल पुष्प वाहुन, पाळणा गीताने जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्रींची पाळण्याची आरती करुन श्रीकृष्णांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, कौशल जाजू, निंगूताई हिंडोळे, सुरेखा तेली, शकुंतला कटारे, बाळू घाटगे, प्रदीप हिंडोळे, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, श्रीशैल गवंडी, सचिन हन्नूरे, जयप्रकाश तोळणूरे आदीसह सत्संग महिला भजनी मंडळाचे अन्य सदस्य व भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात भजन पाळणा कार्यक्रम प्रसंगी उज्वलाताई सरदेशमुख, मंदार महाराज पुजारी, तर पाळणा आरती करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
