गावगाथा

Akkalkot Rural : शिक्षकांनी नितीवान राहून आदर्श विद्यार्थी घडविले पाहिजे – प्रशांत अरबाळे

HTML img Tag Simply Easy Learning    

नागणसूर प्रतिनिधी दि. २०, ” मुलांसाठी गुरुजी हे देव असतात, ते निष्ठेने आदर्श विद्यार्थी घडविल्यास, राष्ट्राची भावी पिढी समाजाबरोबर देशाचेही विकास करतील. त्यासाठी शिक्षक हा नितीवान राहून आपले कर्तव्य केल्यास  विद्यार्थी निष्ठावान व आदर्श बनतात.”असे प्रतिपादन अक्कलकोट तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी प्रचंडे प्रशालेत नागणसूर केंद्रस्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना केले. आणि नागणसूर केंद्र दत्तक घेऊन ते आदर्श करण्याचे आव्हानही केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हनमाने  यांनी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले. यावेळी नागणसूर विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी लकप्पा पुजारी, सोमनाथ स्वामी, राठोडसह केंद्रातील सर्व केंद्रप्रमुख, प्राध्यापक ईरण्णा धानशेट्टी, अनिल इंगळे, प्रशांत नागूरे, शरणप्पा मणूरे, चिदानंद मठपती, बसवराज कोळी, सूर्यकांत कडबगावकर, ज्येष्ठ शिक्षिका सुनिता अलुरकर, सहशिक्षक बसवराज धानशेट्टी, संजय गंगदे,अजय पाटील, भीमाशंकर सोलापूरे, वृषाली जगताप, प्रीती प्रचंडे, प्रमिला विभुते, शिक्षकेतर कर्मचारी थावरु चव्हाण,चनवीर कल्याण, विश्वनाथ तळवार, अर्चना मणूरे, सागर पोद्दार, माणिक किणगी आदीजण उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ वाघमोडे यांनी करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button