कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या सेवेत बससेवा सुरू
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते बस सेवेचे शुभारंभ

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या सेवेत बससेवा सुरू
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते बस सेवेचे शुभारंभ
(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट – दिनांक ३१/८/२४) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा कार्यान्वित झाली आहे. त्याचे शुभारंभ आज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी अक्कलकोट तालुक्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कै. कल्याणराव इंगळे हे एकमेव तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. अक्कलकोट तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावातून तंत्रनिकेतन शिक्षणासाठी येथे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहेत.
अशा विद्यार्थ्यांना ही बस सेवा लाभदायी ठरेल असे मनोगत व्यक्त करून देवस्थानच्या या तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजय पवार, धीरज जनगोंडा, दर्शन घाटगे, उमेश सोनवणे, रवींद्र नष्टे, बंटी नारायणकर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
