गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: परस्थिती कशी ही असो, प्रामाणिक जिद्द असेल तर यशस्वी होता येईल – पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे ; वसंत भांगे यांच्या स्मृती दिना निमित सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप

अक्कलकोट ( प्रतिनीधी ): परस्थिती कशी ही असो, प्रामाणिक जिद्द असेल यशस्वी होता येईल असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी केले. बुध्दवाशी वसंत भांगे यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री एस एस शेळके प्रशाला व ज्यू कॉलेज वागदरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके हे होते प्रमुख उपस्थिती प्रदीप जगताप, बसवराज सोनकांबळे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव, नीजप्पा गायकवाड, शणापा मंगाणे, पोलीस हवालदार अंगद गीते, चंद्रशेखर भांगे प्राचार्य अनिल देशमुख होते

पुढे म्हणाले की विद्यार्थीने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास केले पाहिजे यशस्वी होण्यासाठी गरीब श्रीमंत काही नसतो प्रामाणिक अभ्यास केल्यास यशस्वी होतो त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आज काल मुल मोबाईलचे गैरवापर करत असून मोबाईलचे वापर अभ्यासासाठी न करत फेसबुक व्हॉटसाप मध्ये वेळ घालत आहेत शाळेतील मुलीने न घाबरता त्याच्यावर अन्याय झाल्यास वडिलांना शिक्षकांना सांगितले पाहिजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचण समस्या असल्यास आमचे निर्भया पथक तुम्हाला मदत करण्यासाठी चोवीस तास आहे प्रामाणिक जिद्दी अभ्यास करून वडिलाचे गावाचे नाव रोशन करावे

चंद्रशेखर भांगे हे गेल्या अनेक वर्षापासून सिद्धार्थ सोशल फाउंडेशन माध्यमातून दर वर्षी शालेय मुलांना स्कूल बॅग, शालेय साहित्य, वाटप करता हे कौतुकास्पद आहे

 

यावेळी पोलीस हवालदार लक्ष्मण कांबळे, चिदानंद उपाध्ये,

महादेव सोनकवडे, नितीन हलसंगी, शाम बाबर, नीगप्पा निंबाळ, चीतानंद धोडमनी अस्लम मुल्ला , गौतम कसबे,

निर्भया पथकाचे सन्ना मीयावाले,ज्योती गाजरे, शेख साहेब कुलकर्णी एन डी, मठपती एम पी, वाघमोडे एस सी, नडगेरी व्ही आय. कुरे एस डी, धड्डे के एम,पुजारी व्ही जे प्रशालेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख शेळके आर.बी यांनी केले आभार संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी मानले.

 

सदर कार्यक्रमामध्ये निर्भया पथकाचे टीमने शालेय मुलींना त्याच्या सुरक्षितेबाबत मार्गदर्शन केले मुली महिला कुठल्याही प्रकारच्या संकटात असल्यास निर्भया पथक चोवीस तास आपल्या सेवेत असून कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता बिन्धास्त शिक्षण घ्यावे कुणी छेडछाड करत असेल तर न भीता आई वडील शिक्षक यांना आपले तक्रार सांगा आम्ही तुमच्या सोबत आहे.

-सन्ना मियावाले, निर्भया पथक पोलीस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button