शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक व्हावे..मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम

शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक व्हावे..मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट

आर्थिक प्रगती वेगाने झाल्यामुळे समाजात सातत्याने परिवर्तन होत आहेत, चंगळवाद वाढला आहे, वाचन चिंतन याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विकृत प्रवृत्ती थैमान घालत आहेत. अशा स्थितीत शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक झाले पाहिजे, असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट संचलित मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप, प्रा राजशेखर पवार, प्रा तुकाराम सुरवसे उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विकृत प्रवृत्ती विरुद्ध समाजाने तीव्र मोहीम हाती घेतली आहे. अशा भीषण परिस्थितीत शिक्षकांनी उपदेश केला पाहिजे. समाजाला विधायक वाट दाखविली पाहिजे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वपल्ली डॉ राधाकृष्णन व स्व पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रस्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले तर आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले.

चौकटीतील मजकूर
शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल झाला सत्कार
महाविद्यालयातील डॉ बाळासाहेब पाटील यांचा संशोधनाबद्दल तर एन एस एस उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा राजशेखर पवार यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय प्रा डॉ शितल झिंगाडे, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा तुकाराम सुरवसे, प्रा भिम सोनकांबळे, प्रा मनीषा शिंदे, प्रा विद्याश्री वाले, प्रा शिल्पा धूमशेट्टी, प्रा शीतल फुटाणे, विद्या बिराजदार, प्रा जनाबाई चौधरी, प्रा नेहा गंदमल, प्रा प्राची गणाचारी या प्राध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मल्लिनाथ कल्याणशेट्टी प्राचार्य डॉ राजेंद्र सिंह लोखंडे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी