
शिवसेना लाडकी बहीण योजना मदत केंद्रात महिलांचा मोठा प्रतिसाद…
केंद्रास आकांक्षा चौगुले यांनी भेट देऊन घेतला आढावा
मुरूम, ता. उमरगा, ता. २५ (प्रतिनिधी) : शहरात शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्रास शिवसेना युवा नेत्या आकांक्षा चौगुले यांनी गुरुवारी (ता. २५) रोजी भेट देऊन आढावा घेतला. उमरगा-लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मतदार संघातील ग्रामीण व शहरी भागात सर्वच पात्र महिलांना मिळावा. या अनुषंगाने मतदार संघातील शहर व ग्रामीण भागात शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना मदत केंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्रातून पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलांना त्याचा लाभ घेता यावा व यातून एकही महिला सुटू नये यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्य करीत आहेत. आ. ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या मराठवाडा युवासेना युवती पक्ष निरीक्षक आकांक्षा चौगुले यांनी मतदारसंघातील सर्वच योजनेच्या केंद्रात भेटी देऊन योजनेचा आढावा घेत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या शिवसेना माझी लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्राला दि 25 जुलै गुरुवार रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी भेट दिली. शिवसेना मदत केंद्रात उपस्थित पदाधिकाऱ्यांशी माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अडचणी त्यावरील उपाययोजना यावर चर्चा केली. शहरातील जास्तीत-जास्त महिलांना याचा लाभ मिळवून दयावा. केंद्रात महिलांचा मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. शहर व परिसरातील पात्र महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. मदत केंद्र कार्यालयात आकांक्षा चौगुले यांचा शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृत वरनाळे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे, संतोष मुदकण्णा, सचिन शिंदे, प्रसाद मुदकण्णा, युवासेना शहरप्रमुख भगत माळी, नागेश मुदकण्णा, अमोल कटके, वैभव कटके, श्रावण इंगळे, प्रशांत गुरव, गणेश आपटे यांच्यासह सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. O आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आदेशाने उमरगा-लोहारा मतदार संघातील योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागात शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात पात्र महिलांचे मोफत अर्ज भरून घेत मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येत आहेत. अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची अडचण येत असल्यास ते मिळवून देण्यासाठी मदत केंद्रातच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच केंद्रावर महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. योजनेपासून पात्र महिला वंचित राहू नये याकरिता तालुक्यातील सर्वच मदत केंद्रास भेट देऊन आढावा घेण्यात येत आहे.
आकांक्षा चौगुले
मराठवाडा युवा सेना युवती पक्षनिरीक्षक
