गावगाथा

शाळारूपी मंदिरातील विद्यार्थी हे दैवत अशी शिक्षकाची भूमिका असली पाहिजे– विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे.

शिक्षक दिन विशेष

शाळारूपी मंदिरातील विद्यार्थी हे दैवत अशी शिक्षकाची भूमिका असली पाहिजे– विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे.

नळदुर्ग- ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला.यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या मूल्यमापनासाठी आलेले विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना त्यांना शाळारुपी मंदिरातील देवतेची उपमा दिली. यावेळी त्यांच्यासोबत विस्ताराधिकारी राठोड प्रकाश व केंद्रप्रमुख जाधव सत्येश्वर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सुंदर माझी शाळा या स्वागत गीताने झाली.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे शाळेचे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी सर्व मान्यवरांचा स्मरणिका,गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला.विस्ताराधिकारी यांनी मुलांना अध्ययन-अध्यापन, शाळेची भूमिका, विद्यार्थ्यांचे कर्तव्य या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षक दिनानिमित्त शाळेचे पूर्ण संचलन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले.यामध्ये मुख्याध्यापक सुहाना साहेबअली नदाफ व उप मुख्याध्यापक अतिश विलास राठोड यांनी काम केले.इतर सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवले.दुपारी अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. यानंतर शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. इयत्ता पाचवी ते नववीतील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच दहावीतील काही विद्यार्थ्यांनी देखील त्यांना आज आलेला अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केला आणि शिक्षकाचे कार्य खरंच किती महत्त्वाचे व कठीण आहे याची कल्पना आली हे मान्य केले.यानंतर अधिकाऱ्यांकडून शाळा तपासणी करण्यात आली. शासन परिपत्रकाप्रमाणे सर्व घटक तपासण्यात आले.शाळेतील उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच काही फेरबदल सुचवले.खेळीमेळीच्या व निसर्गरम्य पावसाच्या वातावरणात शिक्षक दिन व शाळा तपासणी संपन्न झाली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button