गावगाथा

वागदरीत 19 व 20 सप्टेंबर रोजी श्री परमेश्‍वर आराधना पर्व पालखी महोत्सव संपन्न होणार..

दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

वागदरीत 19 व 20 सप्टेंबर रोजी श्री परमेश्‍वर आराधना पर्व पालखी महोत्सव संपन्न होणार..

वागदरी – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील जागृत ग्रामदैवत परमेश्‍वराची पर्व पालखी महोत्सवानिमित्त 19 व 20 सप्टेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परमेश्‍वर आराधना पर्व पंचकमिटीने दिली आहे. 18 सप्टेंबर रोजी रात्री कंटली पूजा (धान्य पूजा) व भक्ती गीतांचा संगीत कार्यक्रम शिवशक्ती भजन मंडळ सोलापूर, हनुमान पारिजात भजन मंडळ आलूर.
दि.20 रोजी पहाटे चार वाजता ओम नम शिवाय मंत्र पठण करित म.नि.प्र.शिवलिगेंश्‍वर महस्वामीजी विरक्तमठ वागदरी यांच्या हस्ते श्री ची महारूद्राभिषेक संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री.म.नि.प्र.अभिनव बसवलिंग महास्वामीजी तूपीन मठ नागणसूर यांच्या दिव्य सानिध्यात अंबील घागरीची मिरवणुक ,महाप्राद व दर्शन प्रवचन कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी 1 ते 6 पर्यंत भक्ती संगीताचा कार्यक्रम सप्तस्वर कलावीद बळग सिदगी,रात्री उपस्थित भक्तासाठी भजन ,भारूड,व ढोलसंघ यांचे गायन कार्यक्रम व रात्री 11 वाजता गोंधळी नाटक साजरा होणार आहे.
दि .20 रोजी सकाळी 11 वाजता श्री.म.नि.प्र.स्वामीनाथ महास्वामीजी किवेटश्रर मठ सोलापूर यांच्या शुभ हस्ते ‘श्री’ची भव्य पालखी मिरवणूक सोहळा सुरवात होईल .या पालखी सोहळ्यात मराठवाड्यातील भारूड,भजन मंडळे, लेझिम, झांज पथक, मलखांब, विविध कलादर्शन सादर होतात या महोत्सवा दरम्यान दोन दिवस अंखड अन्न दान म्हणजे महाप्रसाद वाटप होणार आहे या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पंचकमिटी च्या वतीने केले आहे

असा आहे पर्व..!
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळयास पर्व नावाने ओळखले जाते .श्रावण मास संपल्यानंतर उत्तरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात येणाऱ्या गुरुवारी व शुक्रवारी पर्व साजरा केला जातो या परिसरातील शेतकरी बांधव पर्वनंतरच रब्बी पेरणी हंगामास सुरवात करतात या परमेश्वर पर्वा त प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button