चंद्रकांत अशोक शिंगे (बनसोडे)यांच्या वाढदिवस निमित वागदरी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप….
शैक्षणिक उपक्रम

चंद्रकांत अशोक शिंगे यांच्या वाढदिवस निमित वागदरी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप….
वागदरी — यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखाबे यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पंकज सुतार भूषविले सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांची प्रस्तावना मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे सर यांनी केली.
यावेळी प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखाबे ,उपसरपंच पंकज सुतार अक्कलकोट शहर अध्यक्ष विशाल ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य शिक्षण समिती अध्यक्ष हनिफ मुल्ला,भुरीकवठे केद्राचे केंद्र प्रमुख बा. ना. चव्हाण,वागदरी केंद्राचे केंद्र प्रमुख मुनोळी सर एस, एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय चे विभाग प्रमुख संतोष हत्ते ,प्राध्यापक बसवंत गायकवाड, वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष बबन गायकवाड ,नरसिंह गायकवाड ,शाम बनसोडे ,वागदरी शाखा अध्यक्ष उमेश बनसोडे, रविंद्र मुदिनकेरी,सिताराम कुंबळे, शामसुंदर आष्टे आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

त्याप्रसंगी मुलांच्या शाळेत मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे, सहशिक्षक कलशट्टी, रेऊरे , कुणाले , बागवान,उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण प्रेमी शिवशरणप्पा सुरवसे (अक्कलकोट तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ) मुख्याध्यापक बाबासाहेब बनसोडे सर सहशिक्षिका गिरी यांनी परिश्रम घेतले
