श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमास उत्साहाने संपन्न
गणेश उत्सव विशेष

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमास उत्साहाने संपन्न
🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात शुक्रवार सायंकाळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमी विघ्नेश् गणेश मंदिरा समोर शेकडो महिलांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या या सामूहिक स्वरांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.


गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी सायंकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा तिसऱ्या वर्षीही महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पारंपरिक पेहरावातील महिलां सायंकाळी अथर्वशीर्ष पठणासा उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. महिलांनी ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठन करीत गणरायाला नमन केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी, तृप्ती पुजारी, कु.ऋषी पुजारी, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख, सचिव शामराव मोरे, माजी नगराध्यक्षा अनिताताई खोबरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. दरम्यान श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचा प्रारंभ ‘श्रीं’च्या नित्यपूजनाने झाला. श्रींचे पूजन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमात परिसरातील मुली, महिला आदींसह बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. अथर्वशीर्ष पठणानंतर समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी व जमलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. मंत्रोच्चापरात सोहळा पार पडताना भक्तिमय वातावरण बनले होते. नावे नोंदविलेल्या महिलांना अथर्वशीर्ष पोथी मंडळाकडून देण्यात आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांना प्रसाद देण्यात आला.
यावेळी स्मिता कदम, स्वाती निकम, उज्वला भोसले, संगिता भोसले, पल्लवी नवले, सुवर्णा घाटगे, स्वप्ना माने, कविता वाकडे, क्रांती वाकडे, छाया पवार, रुपाली पवार, श्रुती मोरे, कविता भोसले, तृप्ती बाबर, निशा बाबर, मल्लम्मा पसारे मॅडम, कोमल क्षिरसागर, वैशाली क्षिरसागर, वैशाली लोकापुरे, शकुंतला कटारे, सुखदा ग्रामोपाध्ये, संस्कृती ग्रामोपाध्ये, सोनाली लोणी, प्रिया देवकर, अमृता गोळळे, आशा पाटील, सुनिता पाटील, विजू लोणी, रुपाली भोसले, वैशाली यादव, डॉ.आसावरी पेडगावकर, सुरेखा सोनटक्के यांच्यासह आदिजन उपस्थित होते.
कार्यक्रमास न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, अप्पा हंचाटे, बाबुशा महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर,प्रवीण घाटगे, पुरोहित संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, रोहित खोबरे, दत्ता माने, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, मुन्ना कोल्हे, महांतेश स्वामी, धानप्पा उमदी, नामा भोसले, सुमित कल्याणी, संभाजीराव पवार, पिंटू साठे, बाळासाहेब घाडगे, , समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राजेंद्र काटकर, संतोष श्रीमान, विनय भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.