दिन विशेष
सेंट टेरेसा शाळेत दहीहंडी उत्सव साजरा
वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत प्रायमरी सेक्शन इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी आज स्पेशल असेंली चे वेळी मनोरे रचत दहीहंडी फोडली.

सेंट टेरेसा शाळेत दहीहंडी उत्सव साजरा

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी


वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत प्रायमरी सेक्शन इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी आज स्पेशल असेंली चे वेळी मनोरे रचत दहीहंडी फोडली.टीचर सिंथिया माप्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी हंडी फोडून कृष्ण जन्मोत्सव साजरा केला.हंडी फुटल्यावर मुलांनी एकच जल्लोष केला.


ही शाळा कॅथलीक असून येथे विविध जाती धर्माचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या गुण्या गोविंदाने एकत्र येत विविध सण उत्सव प्रेमाने व आनंदाने साजरे करतात हे या शाळेचे वैशिष्ट आहे. यावेळी मुलांना दहीहंडी व कृष्ण जन्मोत्सवाची माहिती देण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून प्रिन्सिपॉल फादर निकी आवर्जून उपस्थित होते.दहीहंडी बांधण्याची तयारी सर अक्षय जाधव व सर मालकम यांनी केली.