गावगाथाठळक बातम्या

Pune : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी): पुण्यात एक भीषण अपघात झाला आहे. शहरातील बी टी कवडे रोडवर फ्रीज गॅसचा स्फोट झाल्याने सीएनजी रिक्षाचा पार चक्काचूर झाला तर एकाला जीव गमवावा लागला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

रिक्षा गॅरेजमध्ये उभी असताना सीएनजीचा अचानक स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

पुण्यातील बी.टी. कवडे रस्त्यावर नवशा गणपतीपुढे भंगार गोळा केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा स्फोट झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की, रिक्षाचे पार्ट हवेत उडून पार चक्काचूर झाले तर रिक्षात बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बी.टी. कवडे रोड येथील एका भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत एका व्यक्तिसा जीव गमवावा लागला आहे. तर इतर तीन व्यक्ति जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींना कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र हा अपघात नेमका कश्यामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button