मंगळवेडातूनच बसवण्णांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाली, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर आणि किरीटेश्वर संस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या शिवानुभव गोष्ठी उत्साहाने संपन्न
सभा संमेलन

मंगळवेडातूनच बसवण्णांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाली, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर आणि किरीटेश्वर संस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या शिवानुभव गोष्ठी उत्साहाने संपन्न
सोलापूर —जागतिक लिंगायत महासभा सोलापूर आणि किरीटेश्वर संस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या शिवानुभव गोष्ठी कार्यक्रमात पूज्य स्वामीनाथ महास्वामी, डॉ. गुरुसिद्धैय्या स्वामी, शिवानंद गोगाव, रवी बिराजदार, राजश्री थळंगे, सिंधुताई काडादी, बसवराज मसूती.

मंगळवेडातूनच बसवण्णांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाल
सोलापूर
बसवण्णा हे सामाजिक चळवळीचे नेते, सोलापूरचे सिद्धराम, हविनाळ कल्लय्या, पुळूजचे अमुगे देवय्या-रायम्मा, नांदेडचे उरीलिंगपेद्दी, गुड्डापूरचे दानम्मा, या सर्व शरण महाराष्ट्रातील वैभव आहे. बसवण्णांनी आपले सामाजिक चळवळीची सुरुवात मंगळवेडातूनच केली. असे अक्कलकोट खेडगी महाविद्यालयचे प्राध्यापक डॉ. गुरुसिद्धैय्या स्वामी आपले अभिप्राय व्यक्त केली .
शनिवारी येथील जागतिक लिंगायत महासभा सोलापूर आणि किरी टेश्वर संस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या शिवानुभव गोष्ठीत ‘महाराष्ट्राचे शरण’ या विषयावर ते बोलत होते.
किरीटेश्वर संस्थानमठाचे पूज्य स्वामिनाथ महास्वामी, बसव केंद्राचे सिंधुताई काडादी, जागतिक लिंगायत महासभा राज्य युवा अध्यक्ष लातूर चे रवी बिराजदार, उपाध्यक्षा मीनाक्षी बागलकोटे, महासभा चे सचिव नागेंद्र कोगनुरे, बसवराज मसुती व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गुरुसिद्धैय्या स्वामी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शरण-शरणींचे थोडक्यात ओळख करून दिली.
जागतिक लिंगायत महासभा राज्य युवा अध्यक्ष लातूरचे रवी बिराजदारा आपले विचार मांडताना , सोलापूर प्रमाणेच लातूरमध्येही लिंगायतांचा प्रभाव आहे. ते शरण व त्यांचे वचनापासून लांब होते कारण वचन साहित्य मराठीत मिळत नसे . अलीकडेश रण साहित्य, वचनांचे मराठीत भाषांतर झाले असून बसवण्णा व शरण यांचा परिचय होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण लिंगायत व शरन साहित्य परिचय चळवळ सुरू केली असून दर महिन्याला बसवकल्याण आणि मंगळवेढा येथे अनुभव मंडप सुरू करून मराठी लिंगायतांना शरण संस्कृतीव साहित्याची ओळख करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी असलेल्या सोलापूर बसव केंद्राच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी म्हणाल्या की, सोलापुरात लिंगायत व शरण चळवळीला चालना देणाऱ्या किरीटेश्वर मठाचे कार्य कौतुकास्पद आहे. किरीटेश्वर मठाचे तत्कालीन पूज्य लिंग. मृत्युंजय महास्वामी यांनी इतिहासात पहिल्यांदा ‘विश्वगुरु बसवण्णांचा विजय असो’ असा जयघोष केला होता. असे म्हणले.
सानिध्य भूषविलेले किरीटेश्वर संस्थान मठाचे स्वामीनाथ महास्वामीजी म्हणाले त्यांचा मठ नेहमी बसवादी शरणाच्या तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ओळखला जातो. जागतिक लिंगायत महासभेच्या उपक्रमांना त्यांचा मठ नेहमीच पाठिंबा देतो. येणाऱ्या काळात शरण तत्व व लिंगायत एकजुटीचे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात सुरू ठेवावा, असे ते म्हणाले.
बसवण्णा व सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व ज्योती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुनीत बिज्जरगी यांनी वचन गायन केले. महा सभाचे युवा अध्यक्ष शिवराज कोटगी , शहराध्यक्ष विजय भावे, महिला अध्यक्षा राजश्री थळंगे, उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, राजेंद्र हौदे, बसवराज लोहार, कविता हलकुडे, जयश्री शेठे, चिन्नम्मा बिज्जरगी, मधु कोळकुर, गीता थळंगे, पूर्णिमा तोटद , राजशेखर लोकापुरे, द.सोलापूरचे अध्यक्ष डॉ.बसवराज नंदरगी, गुरुसिद्ध बगले, श्रीकांत पारे यांच्यासह अनेकांची लिंगायत बांधव उपस्थित होते.
जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शशिकला रामपुरे यांनी आभार मानले.
