गावगाथा

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य विभागाच्या कार्यशाळेस सुरुवात

कार्यशाळा

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य विभागाच्या कार्यशाळेस सुरुवात

(अक्कलकोट, दि.२४/९/२४) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागाची सहा दिवसांची कार्यशाळा ॲडव्हान्स सर्व्हे या विषयांतर्गत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.
संस्थेचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राचार्य एन.बी.जेऊरे, संगणक विभाग प्रमुख विजय पवार, स्थापत्य विभाग प्रमुख धीरज जनगोंडा, प्रा.नितीन ग्राम, प्रा. सचिन घाटगे, प्रा.अजमत जहागीरदार आणि इंजी. राहुल बिराजदार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्राध्यापिक जहागीरदार यांनी बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
बांधकाम सुरू करण्याच्या आधी सर्वेक्षणाचा पहिला महत्त्वाचा टप्पा असतो. सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना सर्वेक्षण या विषयात नैपुण्य मिळवता यावे याचसाठी प्राध्यापिका अजमत जहागीरदार यांनी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस पुणे येथील गॅलोप इन्फ्रा सर्व्हिसेस कन्सल्टन्सी या नामांकित कंपनीचे राहूल बिराजदार, तेजस माने यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या सहा दिवसाच्या कार्यशाळेस देवस्थानचे व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे चेअरमन महेश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी.जेऊरे, शैक्षणिक समन्वयक अमोल भावाठणकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजय पवार आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button