गावगाथाठळक बातम्या

Pune Rain : बुधवारी पुणे जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ ; हवामान खात्याची माहिती

पुणे (प्रतिनिधी): परतीच्या पावसाने मागील तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही भागात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने बुधवारी (दि. 25) पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर आज (मंगळवारी, दि. 24) पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे जिल्ह्यात बुधवारी 200 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर आणि वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button