
चपळगाव येथे माजी मंत्री..सिद्धाराम म्हेत्रे यांचे भव्य सत्काराचे आयोजन
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
22 वर्षाचे अथक प्रयत्नाने उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात आले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांचे व जनतेचे स्वप्नापूर्ती झाले आहे,त्या निमित्ताने धरणातील पाण्याचे जलपूजन व ज्यांचा प्रयत्नानी पाणी आले ते माजी.मंत्री..सिद्धाराम म्हेत्रे यांचे भव्य सत्कार शेतकऱ्याच्यां वतीने आयोजित करण्यात येणार असून, जलपूजन व सत्कार कार्यक्रमासाठी .खासदार.कु.प्रणिती शिंदे, .खासदार..धैर्यशील मोहिते पाटील, .खासदार .ओमराजे निंबाळकर व आमदार.धीरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .सदर जलपूजन कुरनूर धरण महादेव मंदिर येथे होणार असून त्या नंतर सत्कार समारंभ ग्रामीण विद्या विकास विद्यालय पठागन, चप्पळगाव येथे संपन्न होणार आहे, सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी व म्हेत्रे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्तेनी उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करावे, दि 28/9/2024 रोजी सकाळी 11.00 वा सर्वांनी बहुसंख्येनी उपस्तिथ राहून कार्यक्रमची शोभा वाढवावी असे आवाहन काँग्रेस पक्ष नेत्यांकडून करण्यात आले. या पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशपाक बळोरगी, मा. सभापती सिद्धार्थ गायकवाड, तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शाकीर पटेल, कुरनूर सरपंच व्यंकट मोरे,ज्येष्ठ नेते विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्दाराम भंडारकवठे, तालुका उपाध्यक्ष परीक्षित चौघुले, बसवराज बानेगाव, अरुण जाधव, धनराज येळमेली, बाबासाहेब पाटील, स्वामीराव सुरवसे, योगेश निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
