
सेंट टेरेसा शाळेत दिया पेंटिंग उपक्रम संपन्न…
मुंबई प्रतिनिधी…गणेश हिरवे…

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा बॉईज शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलांसाठी नुकतीच येणाऱ्या दीपावली निमित्त दिया पेंटिंग उपक्रम संपन्न झाला.यावेळी जवळपास २०० मुलांनी उत्साहात यामध्ये सहभाग नोंदविला.विद्यार्थ्याची कलात्मक कौशल्ये आणि सृजनशीलता वाढीस लागण्यासाठी या शाळेत नेहमीच विविध कार्यक्रम घेण्यात येतात.आज मुलांनी घरून रंग, ब्रश, सजावटीचे साहित्य, स्टिकर्स, मातीचे दिया आणून शाळेत तो स्वहस्ते छान साजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.सणासुदीच्या काळात आपल्या परंपरा, संस्कृती टिकून राहावी हा या उपक्रमाचा उद्देश होता.चौथीच्या वर्ग शिक्षिका सिंथिया डिमेलो, मीनल कुटीन्हो, डीपसिना डिसोझा, रींकल गोंसालविस यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झाला.उत्कृष्ट तयार करण्यात आलेल्या दियांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी नेहमीच विविध उपक्रम घेण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करीत असल्याचे या शिक्षिकांनी सांगितले.शाळेतील मुलांनी या उपक्रमाचा खूप आनंद घेतला.
