*चपळगाव प्रशालेस 2 कपाटे भेट – लायन्स क्लब, सोलापूरकडून शैक्षणिक बांधिलकी!*
सामाजिक बांधिलकी

*चपळगाव प्रशालेस 2 कपाटे भेट – लायन्स क्लब, सोलापूरकडून शैक्षणिक बांधिलकी!*
चपळगाव —देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचें हात घ्यावे… या काव्यपंक्ती प्रमाणे
लायन्स क्लब ऑफ सोलापूर व लियो क्लब सोलापूर कडून ग्रामीण विद्या विकास विद्यालयास 2 मोठे कपाट भेट देण्यात आले.
यनिमित्त आज प्रशालेत कृतज्ञता कार्यक्रम संपन्न झाले.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी ला.सुरेश जाजू,अध्यक्ष ला. बाळप्पा बेद्रे, ला. देवेंद्र बिराजदार, रोहन बिराजदार, आणि विशेष अतिथी श्रद्धा इन्स्टिटयूट,सोलापूरचे प्रमुख श्री.पराग शहा सर व ला. सौ. स्वाती शहा मॅडम, प्राचार्य माने सर, पर्यवेक्षक बानेगाव सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक CEO नीलकंठ पाटील सर यांनी केले.
यावेळी प्रशालेकडून उपस्थित मान्यवरांचे यथोचित सन्मान करण्यात आले.
प्रमुख अतिथी सुरेश जाजू यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संस्था सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून बांधिलकी जोपसण्याचे कार्य करते. CA संचित पांढरे व ला. स्वाती शहा मॅडम यांच्या देणगीतून 2 कपाट प्रशालेस देत आहोत.
सौ. स्वाती शहा यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, या प्रशालेत विविध शैक्षणिक उपक्रम चालू आहेत. विध्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वी व्हावे.
या कृतज्ञता कार्यक्रमाचे औचित्य साधून “हिंदी सप्ताह”निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने यशस्वी विध्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य देऊन गौरवण्यात आले.हे सर्व शालोपयोगी साहित्य हिंदी विषय शिक्षक माणकोजी सर व भंगे सरांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुलंगे सर व आभार प्राचार्य माने सरांनी मानले.
याप्रसंगी सर्व गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.