नवरात्रीच्या ललिता पंचमीस (पाचवी माळ) हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देवीभक्त सखी महिलांसाठी श्री देवी कुंकुमार्चन अष्टोत्तर शतनामावळी आणि श्रीसुक्ताच्या पठणाचा कार्यक्रम
नवरात्र विशेष

नवरात्रीच्या ललिता पंचमीस (पाचवी माळ) हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देवीभक्त सखी महिलांसाठी श्री देवी कुंकुमार्चन अष्टोत्तर शतनामावळी आणि श्रीसुक्ताच्या पठणाचा कार्यक्रम
🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून न्यासाच्या परिसरातील श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्रीच्या ललिता पंचमीस (पाचवी माळ) न्यासाचे सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवारी सायंकाळी ६ वा. सर्व देवीभक्त सखी महिलांसाठी श्री देवी कुंकुमार्चन अष्टोत्तर शतनामावळी आणि श्रीसुक्ताच्या पठणाचा कार्यक्रम शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*


याप्रसंगी सर्व देवीभक्त सखी महिलांसाठी श्री देवी कुंकुमार्चन अष्टोत्तर शतनामावळी आणि श्रीसुक्ताच्या पठणाचा कार्यक्रम हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अलकाताई जन्मेजयराजे भोसले आणि सचिवा सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांनी आयोजित केली होते.

या कार्यक्रमास शहरातील असंख्य सखी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास संस्थेकडून उपस्थित सर्व सखी महिलांना श्रीयंत्र, श्री सुक्त पोथी, तुळजाभवानी देवीचा फोटो आणि कुंकू देण्यात आले. श्री देवीस महाआरती नंतर उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने कार्यक्रम संपन्न झाले. आरती नंतर उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल देवीभक्त सखी महिला वर्गातून कौतुक होत आहे.


यावेळी कु. तेजस्विनी अमोलराजे भोसले, चि. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.स्वामिनी अमोलराजे भोसले व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारीसह शेकडो महिलासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
*चौकट :*
नवरात्रीचा पाचवा दिवस, अर्थात ललितापंचमीचा. अतिशय महत्त्वाचा. देवीची लालित्यपूर्ण वर्णने वाचून साधकाला बाह्य जगताचा विसर पडून तो आंतरिक जगतात रममाण होतो. तल्लीन होतो. लौकिक, सांसारिक, मायिक बंधनातून मुक्त होऊन त्याचे मन विशुद्ध होते. पद्मासनात ध्यानधारणा करून स्कंदमातेचे स्मरण करणाऱ्या साधकाला ध्यान-एकाग्र वृत्ती वाढवत पारमार्थिक मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते असे म्हणतात, की स्कंदमातेची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण होते. एवढेच नाही, तर भवसागर तरून पैलतीर गाठण्याचे, अर्थात मोक्षाचे दार खुले होते. स्कंद मातेच्या उपासनेत आपोआप स्कंद भगवानची देखील उपासना होते.