Akkalkot: दहिटणेत स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री सखी देवराई संस्थेकडून वृक्षारोपण

अक्कलकोट (प्रतिनिधी): दहिटणे येथील ज्ञानगंगा प्रशालेत 78 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री सखी देवराई या संस्थेच्या वतीने वड, पिंपळ, कडुनिंब, भोकर, कांचन ताम्हण, पारिजातक, अशोक सारख्या स्थानिक प्रजातींच्या 78 रोपांचे लागवडीच्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.

सर्वप्रथम ज्यांच्या प्रेरणेतून संस्था निर्माण झाली अशा शिवस्नुषा महाराणी येसूबाई यांच्या प्रतिमेचे पुजन छत्रपती प्रतिष्ठान व वृक्षसंवर्धन समिती मैंदर्गी चे अध्यक्ष गणेश गोब्बूर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळेचे संस्थापक शिवाजीराव पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षलागवड आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दहिटणेचे सरपंच मा.नितीन मोरे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सुरवसे सर,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह छत्रपती प्रतिष्ठान चे गणेश गोब्बूर, योगेश फुलारी,अनिल नागणसूर श्री सखी देवराई संस्थेचे मिथिला पाटील,विकास घोडके,सुर्याजी शिंदे,प्रचिती पाटील,ग्रामस्थ मंडळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन कांबळे सर यांनी केले तर आभार श्री सखी देवराई संस्थेच्या मिथिला पाटील यांनी मानले.
