सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्यावतीने आयोजिलेल्या आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करून शाळेतील विविध प्रकारच्या परिक्षेत यश प्राप्त करत करतच मन व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवून देशाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा. - बसलिंगप्पा खेडगी

अक्कलकोट, दि. २५- येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्यावतीने आयोजिलेल्या आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. डॉ. शिवराय आडवीतोट यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून खेडगी महाविद्यालयाच्यावतीने प्रतिवर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजिली जाते. यंदाच्या वर्षी २३ ते ३० जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. या उदघाटनप्रसंगी उपप्राचार्य प्रा. बसवराज चडचण, प्रभारी पर्यवेक्षक प्रा. संजय कलशेट्टी, प्रा. विलास अंधारे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय बिराजदार, अन्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, हजारो विद्यार्थी – विद्यार्थ्यिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंदन सोनकांबळे यांनी केले.

चौकट
विविध ९ प्रकारात रंगणार स्पर्धा

महाविद्यालय परिसरातील मैदान आणि विविध क्लास रूममध्ये या स्पर्धा सुरू आहेत. क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, खो- खो, टेबल टेनिस, कॅरम, अॅथलेटिक्स, चेस या नऊ विविध क्रीडा प्रकारात या स्पर्धा रंगणार आहेत.

चौकट —
विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करून शाळेतील विविध प्रकारच्या परिक्षेत यश प्राप्त करत करतच मन व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवून देशाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.
– बसलिंगप्पा खेडगी
चेअरमन – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी.
