श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील महाप्रसाद सेवा म्हणजे श्रींची कृपा – महंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज
अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील महाप्रसाद सेवा म्हणजे श्रींची कृपा – महंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली महाप्रसाद सेवा ही साक्षात श्रींची कृपा व श्री अन्नपूर्णा माताची प्रसन्नता असल्याचे गौरवोद्गार उज्जैन (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री महंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज (महाकाल) यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आगमन झाल्यावर बोलत होते. यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते व विश्वस्त भाऊ कापसे यांच्या उपस्थितीत त्यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात अतिश पवार, विशाल कलबुर्गी, प्रवीण घाटगे, गोटू माने, निखील पाटील, मुन्ना कोल्हे, शहाजी यादव, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस. के. स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह इतर सेवेकरी व कर्मचारी उपस्थित होते.