*‘कोणत्याही क्लासेसला न जाता मिळवले यश’ राज्यसेवा मुख्य परीक्षेत विनायक पाटील राज्यात ‘पहिला’* ——
‘एमपीएससी’कडून २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

*‘कोणत्याही क्लासेसला न जाता मिळवले यश’ राज्यसेवा मुख्य परीक्षेत विनायक पाटील राज्यात ‘पहिला’*
——
MPSC Results : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मुदाळ (ता. भुदरगड) येथील विनायक नंदकुमार पाटील ( Vinayak Nandkumar Patil MPSC ) याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली.

राज्यातील लाखोंच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. अशात आई-वडील दोघेही शेतकरी, कोणतेही क्लास न लावता कोल्हापुरातील खासगी अभ्यासिकेत अभ्यास करत विनायक पाटील याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

मुदाळ गावात बारावीपर्यंतचे शिक्षण आणि त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्याने बी.एस्सी. केली, याकाळात त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पुण्यातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कोल्हापुरात खासगी अभ्यासिकेत अभ्यास सुरु केला. विनायक हा दुसरा प्रयत्न होता विनायक पाटील याने सहा महिन्यांपूर्वी विक्रीकर अधिकारी व उपशिक्षणाधिकारी परीक्षेतही यश मिळवले होते.
पिढ्यानपिढ्यांच्या कष्टाची उतराई – वडिलांची भावुक प्रतिक्रिया । Vinayak Nandkumar Patil MPSC

त्याच्या या यशामुळे आई वडील भावुक झाले आहे, माध्यमांशी बोलतांना विनायकचे वडील नंदकुमार पाटील यांनी सांगितले, ‘माझा मुलाने महाराष्ट्रात प्रथम येत आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या कष्टाची उतराई केली. ‘ असे म्हणत ते भावुक झाले,

‘घरच्या प्रतिकूल परिस्थितीने… | Vinayak Nandkumar Patil MPSC

तर या यशाबाबत माध्यमांशी बोलतांना विनायक म्हणाला, ‘घरच्या प्रतिकूल परिस्थितीने सतत जाणीव करून दिली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली. पुणे व कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून विविध परीक्षा दिल्या. कोणत्याही क्लासेसला न जाता स्वयंअध्ययनावर भर दिला आणि त्याच जोरावर आजचे यश मिळाले.’ असेही त्याने सांगितले आहे.