गावगाथा

कवी तुषार पाटील यांची राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

संपूर्ण भारतातून १० संशोधकांची निवड करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रातून कवी तुषार पाटील हे 'निमंत्रित संशोधक' म्हणून सहभागी होणार आहेत.

 

HTML img Tag Simply Easy Learning    

कवी तुषार पाटील यांची राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे : येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थी आणि कवी तुषार पाटील यांची ‘विश्वभारती केंद्रिय विद्यापीठ’ शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल) येथे होणाऱ्या ‘मानव्यविद्येतील संशोधन पद्धती’ या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

विश्वभारती केंद्रिय विद्यापीठ, शांति-निकेतन, पश्चिम बंगाल येथे भाषा भवनातील मराठी विभागाच्या वतीने दिनांक २ ते ८ जानेवारी २०२४ दरम्यान ‘मानव्यविद्येतील संशोधन पद्धती’ या विषयावरील ७ दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत विश्वभारती आवारातील ५० तर संपूर्ण भारतातून १० संशोधकांची निवड करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्रातून कवी तुषार पाटील हे ‘निमंत्रित संशोधक’ म्हणून सहभागी होणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्या या निवडीबद्दल मराठी विभागप्रमुख आणि मार्गदर्शक डॉ. तुकाराम रोंगटे तसेच मित्र डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

……………………………………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button