श्रीमंत कमलाराजे चौकातील आयलँड (कारंजा) सुरु करण्यासाठी एक पाऊल पुढे ;
सकाळी राबविली गेली त्याची संपूर्ण स्वच्छता मोहीम

श्रीमंत कमलाराजे चौकातील आयलँड (कारंजा) सुरु करण्यासाठी एक पाऊल पुढे ;

सकाळी राबविली गेली त्याची संपूर्ण स्वच्छता मोहीम

अक्कलकोट शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला प्रियदर्शनी मंगल कार्यालय जवळील श्रीमंत कमलाराजे चौकातील आयलँड (कारंजा) सुरु करण्यासाठी आज त्याची स्वच्छता मोहीम राबवून एक पाऊल पुढे टाकले गेले. आज रविवारी सकाळी निसर्ग सेवा फौंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माधवप्रभात शाखा आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीच्या सदस्यांचा समावेश होता. अक्कलकोट शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे आणि स्वामी भक्तांची संख्या देखील मागील तीन वर्षापासून प्रचंड वाढलेले आहे. शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे कमलाराजे चौकातील आयलँड (कारंजा) तसेच अक्कलकोट बस स्थानकाजवळील दुसरे आयलँड हे गेल्या अनेक वर्षापासून देखभाल अभावी बंद आहेत. पाणीटंचाई हे त्यातले एक महत्वपूर्ण कारण होते. पण यावर्षी पावसाळा चांगला झालेला असल्याने आणि पाणीपुरवठा ही सुरळीत असल्याने. हे दोन्ही आयलँड पुन्हा सुरू झाल्यास अक्कलकोटच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडणार आहे. अनेक सामाजिक संस्थेच्या सूचनेचा विचार करून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हे दोन्ही आयलँड (कारंजा) सुरु करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. त्या अनुषंगाने हे दोन्ही आयलँड सुरुवातीस स्वच्छ करून घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेऊन नगरपरिषद सहकार्याने त्यातील एक आयलँड आज स्वच्छ करण्यात आले. येत्या काही दिवसात त्यातील अडचण दुर करून हा कारंजा सुरु करण्याचा मनोदय डाके सरांनी व्यक्त करून सदर उपक्रमाबद्दल सामाजिक संस्थांचे आभार मानले व त्या सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागाचे संपूर्ण सहकार्य लाभले.या स्वच्छता मोहिमेसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, स्वच्छता कर्मचारी तसेच निसर्ग सेवा फौंडेशनचे
सुनिल बिराजदार, विद्याधर गुरव, महेश वागदरे,रुद्राक्ष वैरागकर, प्रमोद लोकापुरे, धुळपा बजे, संतोष वगाले, विशाल पसारे, प्रसाद हारकुड, विजु आळविकर, सायबण्णा सोनकांबळे, संदीप कटकधोड, महेश लंगोटे, शिवाजी चौगुले,गुंडू येळमेली,सुशील हिरस्कर,अंबण्णा यारोळे,सुरेश पाटील आदींचे परिश्रम कामी आले.
